What are the solutions on corona crises Indian government has?

It Has been nearly 40 days we all are at home lock-down.  therefore the money of people for middle class and poor class getting spent. so whats the government is doing for them. I want to give some suggestions.

 

आज सर्वांना घरात बसून 40 दिवस होत आले आहेत. सर्व सामान्य व आर्थिक दृष्टया दुर्बल असणार्या कर्मचार्यांच्या, तसेच कमी व मध्यम वर्गाच्या, जनतेजवळचा पैसा पुर्णपणे संपत आला आहे. अजुनी किती दिवस घरात बसायचे हे ठामपणे अनिश्चित आहे.

(पुढील 30 दिवस काम केल्याशिवाय पगार/वेतन मिळणार नाही. हे ही 30 दिवस कसे काढायचे हे पण एक मोठ्ठे प्रश्नचिन्न सर्वांसमोर उभे ठाकले आहे)

आता पुढे काय करायचे असा विचार देखील सर्वांना धस्स करून जातो आहे. जस जसे दिवस पुढे जात आहेत तस तशी सर्वांचीच भिती वाढत आहे.

या येणार्या आर्थिक संकटावर/अडचणीवर आत्तापर्यंत मा.मुख्यमंत्री, मा.राज्यपाल, मा.पंतप्रधान, कोणताही नेता, तसेच कोणताही ही उच्चशिक्षित अधिकारी, (IAS) अधिकारी, कलेक्टर, अर्थ मंत्री व पालक मंत्री, या विषयावर स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीयेत.

poor people of India in corona

ज्या विषयाकडे जास्तीत जास्त गंभीरपणे लक्ष द्यायला पाहीजे तिकडे कोणताही मोठा नेता वा अधिकारी लक्ष घालत नाहीये, तसेच तो येथून पुढे येणार्या अडचणींबद्दल देखील बोलत नाहीये.

इथून पुढे सर्वांच्या आर्थिक विवंचनेचा मोठ्ठा प्रश्न उभा रहाणार आहे. याचा विचार कोणीही आत्ता पासून करत नाहीये.

सरकारचा प्रायव्हेट कंपन्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. ते त्यांच्या कर्मचार्यानां माहे एप्रील चे व माहे मे चे वेतन/पगार देणार आहेत किंवा नाही, याची पूर्व कल्पना कोणत्याही कर्मचार्याला नाहीये. त्याने या पुढील काळात कुटुंबाचा गाडा कसा ओढावा याचा मोठ्ठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

लाॅकडाऊन काळात कामच केले नाहीतर मालक वर्ग वेतन / पगार कोठून देणार.काही लोकांना तर अजून माहे * मार्च * चा पगार मिळाला नाहीये. त्यांनी काय करावे. याची दखल अजुन पर्यंत कोणी घेतली आहे का ?

या वर सरकारने आता तरी त्वरीत ठोस पावले उचलावीत अन्यथा सर्व कर्मचारी वर्गाला / सामान्य जनतेला महाभयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. आता पर्यंत या उदभवलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण ? तसेच कौटुंबिक आर्थिक तुटीला जबाबदार कोण ?

 

माझ्या मते या संकटा वरती मात करण्यासाठी एक आणी एकच ठोस उपाय आहे. तो म्हणजे सरकारने नवीन नोटा छापून तात्पुरत्या चलनात आणणे. ज्या संबंधित व्यक्तीचे वेतन/पगार त्याच्या (प्रमाणीत ऐपती नुसार) जस-जसे त्याला मिळत आहे/होते, तस तसे वेतन/पगार त्याला दर महा देणे (जास्तीत जास्त सहा ते बारा महीने पर्यंत.) गरजेचे आहे. ही सर्व रक्कम त्याला “कर्ज स्वरूपात” देणे व तसे त्याच्या कडून कायदेशीररित्या ( विहीत नमुन्यात ) लिखीत स्वरुपात घेणे. ही मोठ्ठी जबाबदारी सरकारला स्वीकारावीच लागेल आणि इथेच सरकारची सत्वपरीक्षा पणाला लागेल.

नंतर, सर्व काही परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्याच्या वेतन/पगारातून, ही रक्कम ठराविक हप्त्याने दरमहा वसूल करणे व तशी त्याची तजवीज करणे. याची जास्तीत जास्त रक्कम वसुलीची जबाबदारी तो काम करत असलेल्या मालकाची राहील.

कारण एकंदरीत सर्वंच मालकवर्ग स्वतःचे पैसे कर्ज स्वरूपात देण्याच्या मनस्थितीत असतील किंवा नसतील हे सांगता येणार नाही, निदान एवढी तरी जबाबदारी त्यांनी उचलावी.

जसजशी रक्कम वसुल होत जाईल तस तश्या नोटा (छापलेल्या रक्कमे इतक्या) चलनातून बाद करण्यात याव्यात.

वरील उपाय शिस्तबध्द पध्दतीने पार पाडले तरच सर्व कामगार /कर्मचारी व इतर सर्व लोक सहा महिने ते वर्षभर घरी थांबण्याची तयारी दाखवतील व आपणाकडून मिळालेल्या सोयीबद्दल व दिलेल्या सहकार्याबद्दल बांधिल रहातील. तसेच सरकारला मनापासून धन्यवाद देतील.

संदीप कर्णिक.

फ्लॅट नंबर 172, जी-1
जय स्वामी कृपा को. हो.सो.
स्वामी कृपा अपार्टंमेट
कानसाई विभाग,
अंबरनाथ (पुर्व) – 421501
मो.न. – 9372354846

[ The above blog is the authors personal thoughts. It is published to wake up the government. The writing is not from Mumbai Web]

Leave a Reply